STORYMIRROR

VIJAY WATHORE

Romance

3  

VIJAY WATHORE

Romance

तू आणि मी

तू आणि मी

1 min
1K



तू हसरी परी

मी रडका कुमार

तू सुखाची पर्वणी

मी दुःख अपार


तू चकाचक मर्सिडीज

मी धूळखात फटफटी

तू बंगल्याचा गेट

मी झोपडीची ताटी


तू नवी कोरी कार

मी तिचा ग घसारा

तू व्यवस्थित जीवन

मी विखुरलेला पसारा


तू सुंदर फुलपाखरू

मी रातकीडा किरकिर

तू जगतेस मनसोक्त

मी फिरतो ग भिरभिर


तू धुंद पायवाट

मी झुळुकेचा पहारा

तू धडकटी लाट

मी शापित किनारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance