हे कोणते वळण ...
हे कोणते वळण ...
चालता चालता हे ,
कोणते वळण आले,
कळेना मला कसे ,
तु मला मी तुला मिळाले...
कालचीच बात होती ,
अनोळखी रात होती,
आज ओळखीचे दिवस आले ,
तु मला मी तुला मिळाले...
ही घडी नविन आहे ,
गोड स्वंदनाची गीत आहे,
मोहरल्या काळजात स्पंदने आले ,
तु मला मी तुला मिळाले...
पायवाट कधीची संपली होती ,
तरी हाती हात होते,
खांद्यावर तुझ्या विसावे सुखाचे नाते,
तु मला मी तुला मिळाले ...
जुळून आल्या मनाच्या साथी,
बांधल्या मनाने रेशीमगाठी,
साताजन्मांचे प्रितीबंध जुळले ,
तू मला मी तुला मिळाले ...

