हे चिमुकले गाव...!
हे चिमुकले गाव...!


हे चिमुकले गाव माझ्या,
जीवाचे रान हिरवे-हिरवे..
कोण! फूल एक कोवळे,
गंधारल्या ऋतूत हसले...! १.
तिच्यात..गुंतावे ते क्षण!,
..क्षणांच्या शृृंखलाच सार्या..
अन् स्पर्श रेशमी गात्री,
ती रूणझुणते सतारीचे वारे...! २.
चिंब भिजावे तिच्यासवे,
गात तृप्तीचे आनंदी गाणे..
घ्यावे भरूनी हृृृदयात,नेत्री,
तिचे अभिरूप गोड सलोने...! ३.
तिच्या डोळ्यांतले गूढ...खास,
जणू..लोलक ते..! चंद्रमांचे..
तिचे माझ्या निजेला असावे,
अन बध्दतेत पाश करांचे..! ४.
तिच्या कोवळ्या मिठीचे बंध,
...ते पाश सुटतील काय..?!
तिचे प्रीतभारे लोभ असे,
हे..मोह आटतील काय...?!! ५.