हे बा भिमा
हे बा भिमा
हे भिम बाबा.
आज या समाजाला खरी
तुझीच गरज भासते
तु दिलेल्या मार्गाने जायला
त्यांना बुध्दिमत्ता आडते
खरच सांगतो मी समाजाला
निपचित पडलेला जागा हो
चिखलात लोळण्या पेक्षा
समाजक्रांतीचा धागा हो
कितीही समजावले समाजाला
तरी बदल काही घडणार नाही
जो पर्यंत समाजातील प्रत्येकाला
तुझी किमंत कळणार नाही
हे भिम बाबा......
भरकटत गेलाय रे समाज
त्याला सुधरायला हवयं
बदलले नाही आणखी कोणी
त्याला बदलायला हवयं
त्याच्या गळ्यातील मडके काढून
तू त्यांच्या गळ्यात चैन घालती
तुझ्या बावीस प्रतिज्ञा विसरत
तोडाला लावली रे यांनी बाटली
तुझ्याच मेहनतीने आज तो
चारचाकी गाडीत फिरतोय
हे भिम बाबा.....
तुला जवळ न करता तो
३३ कोटी देवांना जवळ करतोय
लाज सुध्दा वाटत नाही त्याला
असे समाजा विरुद्ध करायला
भिम बाबा तुला बाजूला सारुन तो
जातो देवीची ओटी भरायला
हे भिम बाबा.....
विसर पडत चाललाय आता
तु दिलेल्या सवलतीचा
सोन्या-चांदीने नटला समाज
माज मिरवतोय दौलतीचा
दौलत फक्त तुझीच देणगी आहे
समाज आता विसरु लागला
बावीस प्रतिज्ञा विसरुन तो आता
हळदकुंकू,भंडारा उधळू लागला
