हास्य कविता
हास्य कविता
निवडणुकीचे सगळीकडे सूटलेय वारे
पक्षांचे थवे उडतील खात लुटीचे चारे
निवडणुकीचे सुरु होतील आता प्रचार
हात जोडत येतील पुढारी सांभाळत पोटाचा भार
मतं द्या आम्हालाच करू आम्हीं सुधारणा
विकसित देशाचे गाजर दाखवीत बोलतील दणाणा
हळूच सरकवतील कार्यकर्ते हातात हजाराची नोट
यांचे नाव लक्षात ठेवा नि द्या यांनाच वोट
देऊ पक्की घरे नि नळयोजना घरांत
गॅसला देऊ सबसिडी बिनव्याजी दरात
पांढऱ्याशुभ्र कपड्यातील बगळेच जणू
दात विचकत हात जोडतील साधुसंतच म्हणू
करतात आखणी आपल्याच फायद्याची
जमा करून पूंजी पुढील सात पिढ्यांची
आचारसंहिता लागू होईल तंवर येतील घरांत
निवडून आल्यावर करणार नाहीत उभे दारांत
निवडणुकीच्या काळात लायकीही घसरणार
पुढील पाच वर्षांत सगळे वायदे विसरणार
कार्यकर्त्यांना फेकतील उरलेसुरलेले तुकडे
मोठा हात मारून खुर्ची बळकावतील फाकडे
