STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

गुरूपौर्णिमा

गुरूपौर्णिमा

1 min
168

गुरूचे स्थान

मनात अभंग

धरीला हो संग

भक्तीचे भान ...


गुरू चरण

पुजा भक्तीभावे

भाव गुंतवावे

हृदयी कण ...


गुरूची सेवा

 नित्यनेमे करू

 भक्तिभाव भरू

 हृदयी ठेवा ...


संस्कार दिले

गुरूंनी मजला

अनेक त्या कला

शिक्षण दिले ...


गुरू अनेक

मार्गात भेटले

शिक्षण घेतले

क्षण एकेक ...


त्यांचे आभार

शतशः प्रमाण

ज्ञानाचीच खाण

दिला आकार ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational