गुरु
गुरु
गुरु असतोच असा रस्त्यासारखा
स्वतः एका जागी राहणारा,
तरीही त्यासोबत चालणाऱ्या
वाटसरुला धैयापर्यंत पोहचणारा!
गुरु असतोच असा दगडासारखा
स्वतःला अचेतन भासवणारा,
तरीही त्यासोबत राहणाऱ्या
प्रत्येकाची चेतना जागवणारा!
गुरु असतोच असा पुस्तका सारखा
स्वतः मात्र नेहमी बंद राहणारा,
तरीही उघडलेच कोणी त्याला
तर त्याचे सारे ज्ञानाचे दारे उघडणारा!
गुरु असतोच असा वृक्षासारखा
कोणाचीही अपेक्षा न ठेवणारा,
तरीही ज्याला जे हवे ते
नियमित पणे भरभरून देणारा!
गुरु असतोच असा नभा सारखा
नियमित सोबत राहणारा,
तरीही क्षितिजा वाणी भासवून
आपल्याला उभा करणारा!
गुरु असतोच असा चंद्रसारखा
स्वतः मात्र शीतल राहणारा,
तरीही प्रत्येकाच्या मनात
क्रांतीची ज्वाला भडकवणारा!
गुरु असतोच असा सूर्यासारखा
स्वतः अग्नीत जळणारा,
तरीही अवती भवतीचे
जीवन पुष्प फुलवणारा
