गुड बाय
गुड बाय
नको घेऊस ना रे निरोप
इतक्यातच सम्पला कारे सहवास
अजून तुझा सहवास हवासा वाटतो
नकोना रे निरोप घेऊस-----
क्षण न् क्षण आठवतो आपल्या प्रीतीचा
कण न् कण रोमांचित होतो मनाचा
अजुनी विरल्या नाहीत स्मृती आपल्या सहवासाचा
वाटतो अजून हवाय सहवास तुझा-----
अरे,क्षणा, मला अजूनही जागायचंय
खूप काही करायचंय
बरंच काही राहिलंय
वेळच नाही मिळाला मनासारखं जगायला-----
नको ना रे घेऊस निरोप
नाही करत तुझ्यावर आरोप
तुझ्या येण्याच्या भीतीने
हे क्षणभंगूर आयुष्य पूरवून पूरवून जगले------
थांबना रे थोडासा
अजून जगूया ना प्रेमाने
आनंद घेऊया जीवनाचा
भरभरून रस पिवूया प्रेमाचा
