STORYMIRROR

Savita Kale

Inspirational

3  

Savita Kale

Inspirational

गरूडझेप

गरूडझेप

1 min
11.5K

लहानपणी सारेच आपण

कागदी विमान बनवायचो

ध्येय अचूक नजरेसमोर

लक्ष्य कमालीचे साधायचो


आयुष्याचे तसेच नाही का

क्षितीज नेहमी खुणावतं

शिखरावर बसुनी यश

आपल्याला सतत हिणवतं


आयुष्याचं पुस्तक शिकवते

आपल्याला रोज एक धडा नवा

जीवनाच्या परीक्षेत पास होण्यासाठी

शिकणारा मात्र ध्येयवेडा हवा


गरुडझेप आसमंती घेऊन

यशाला प्रयत्नांच्या मुठीत घ्यावं

लहानपणीच्या कागदी विमानासारखं

क्षितिजाला गवसणी घालून यावं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational