STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Children

3  

शुभांगी कोतवाल

Children

" ग्रीष्म "

" ग्रीष्म "

2 mins
177

उन्हाळ्याची ती असह्य गरमी, आणि शाळेची सुट्टी ,

मनात साठवलेल्या आठवणी हळुवार डोकावति ,

एखादे सुंदर चलचित्र बनून डोळ्यासमोरून सरत जाती , 


पांढरी - लाल - गुलाबी , गोड सुवास असलेली मधुमालती ,

कोणाच्या दारावर नाजूक वेलबुट्टी सारखी कमान करून , झुलत असलेली ती सुंदर फुले , 

कुठल्याही सुई वा दोऱ्याचा वापर न करता ,

फुलं एकात एक गुंफून केलेली नाजूक वेणी ,


जाई - जुई च्या कल्या व फुले तोडून केलेला

सुंदर दाट असा गजरा , ओल्या कापडात गुंडाळून

त्या कळ्या सकाळी उमलून ताजीतवानी दिसणारी फुलं! 


संध्याकाळी कुठेतरी बागेत बकुळ फुले वेच्ण्याची धडपड , 

फुलं ओंजळीत घेवून , भरगच्च सुवासाचा मिळणारा आनंद , 

दोऱ्यात ती फुलं ओवून केसात लांब सडक माळलेला दोन - तीन पदरी गजरा ,

आणि मानेची हालचाल होता तो गजरा ही दिमाखाने हालत असे ! 


कडू लिंबाच्या झाडाखाली पडणाऱ्या लिंबोण्या 

वेचून , त्यातही लागणारी चढाओढ , कोणी किती लींबोण्या वेचल्या त्यासाठी ! 

लिंबोण्याचा तो कडवट वास , आणि कडुलिंबाच्या

 झाडाची ती थंडगार वाऱ्याची झुळूक , थोडा गर्मीचा त्रास कमी करून जात असे ! 


मोठ्या बागेत व रस्त्याच्या कडेनी दिसणारा तो 

 विलक्षण मोहक , नाजूक , रंगबेरंगी गुलमोहर ! 

बहरलेला तो ग्रीष्म व वसंत ऋतुतला निसर्ग ! 

मनाला विलक्षण आनंद देवून जात असे !


जोडीला ते आंबट गोड चिंचेचे झुपके , आणि ती 

पांढरी - गुलाबी - हिरवी अशी विलायती चिंच ,

गोल वेढे असलेली व खाताना घश्यात दाटणारी 

नेम घेवून दगड मारून झाडावरून पडलेल्या त्या कच्च्या कैऱ्या ,

आणि पिकलेली गोडचटक पण चिकट अशी भोकरं !

फ्रॉकच्या घेरात गोळा करून जपून घरी आणत असू !


मैत्रिणीन बरोबर सायंकाळी तो विटीदांडू व लपंडाव , 

रस्त्यावर आखून त्यावर तो खेळलेला लांगडीचा खेळ , 

सागरगोटे , चेस व अनेक खेळ आठवणीत साठवले गेलेत . 


निसर्गाचा असा बेफाम लुटलेला आनंद , परत घेता येईल का ? 

परत जीवनात असा वसंत फुलेल का ? 

पुन्हा कधी असा हृदयाला भावणारा , निसर्गाचा आस्वाद घेता येईल ना ? बेफाम जगायला मिळेल ना ? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children