STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Children

2  

Samiksha Jamkhedkar

Children

गरीब विद्यार्थ्यांचे मनोगत

गरीब विद्यार्थ्यांचे मनोगत

1 min
107

खेड्यात झालो दहावी चांगल्या मार्काने पास।

अकरावीत शिक्षणासाठी शहरात आलो खास।

अबब! इथे काय मोठी गर्दी

सकाळीच उठल्यावर शिंका आणि सर्दी।

पाहिल्यादिवशी मी क्लासमध्ये गेलो।

हाय फाय मुले मुली काय त्यांचे भारी कपडे।

माझा तर एक पॅन्ट एक शर्ट ते पण ढगळ आणि वेगवेगळे।

कॉलेजची पोर तर होती सुटबुटात।

वातडलेल्या चपला माझ्या पोट दुखेल कुत्र्याचे गेल्या जरी 

पोटात।

कॉलेजच्या सॅक होत्या भारी भारी

पण त्यात स्नॅक्स, कुरकुरे, बिस्कीट,कॅडबरीने भरलेली।

माझी मेली एक कॅरीबॅग हातात होती पण, चार वह्या त्यापण मोत्याच्या अक्षरांनी भरलेली।

सकाळीच मुलांना ट्युशनला जायची घाई।

मी मात्र ट्युशन लावलीच नाही।

होस्टेलवर ठेवले होते मला पोटाला चिमटा घेऊन।

खर्च जास्त करणार नाही,ट्युशन लावणार नाही असे वचन मी आई बाबांना टाकले होते देऊन।

धिंगाणा करण्यासाठी कॉलेजची पोर वर्गात मागे बसायची।

त्यामुळे सगळ्यात पुढच्या बेंचवर

माझी जागा असायची।

शिक्षकांच्या मनात देखील मी लवकर घर केलं।

माझ्या परिस्थितीकडे बघून त्यांनी चांगलंच शिकवलं ।

कौतुक होत होत माझं सगळ्या सरांकडून वेगळ वेगळ।

बुद्धीने माझ्या हळूहळू शिकून घेतलं सगळ।

आई तुला मी सांगतो आता हुशार मी इतका झालो।

सगळ्या पोरात मी गरीब आहे हेच विसरून गेलो।

सगळे टिंगल करणारी मित्र माझ्याभोवती असतात गोळा।

नोटस काढून माझ्याकडून न्यायाचा लागला त्यांना चाळा।

स्पर्धेच्या दुनियेत मी बुद्धी वापरून शिकेन।

आई- बाबा गरिबीचे पांग मी लवकरच फेडेन।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children