STORYMIRROR

Smita Doshi

Inspirational

4  

Smita Doshi

Inspirational

गरीब वेदना आनंदी

गरीब वेदना आनंदी

1 min
382

जरी असलो आम्ही गरीब

तरीही आहोत आम्ही आनंदी

झोपायला धरती नि उशाला धोंडा

झोप लागते आम्हाला एकदम शांतीची------


 गरिबीच्या वेदना आम्हालाच माहित

पण आम्ही नाही त्याचा बाऊ करीत

आला दिवस पुढे ढकलतो

उद्याच्या भाकरीच्या आशेवर निवांत झोपतो-----


येणारा उद्या कसा असेल माहित नसते

पण तरीही मनाला चिंता नसते

तीन दगडांच्या चुलीवर

भाकरी आमची शेकतच असते-----


इतरांना पाहून कधीकधी मन दुखावते

स्वतःच्या परिस्थितीवर उदासीनता येते

पण क्षणभरच---

त्यांनतर सारं विसरायला होते-----


आमची ही दुनिया आम्हाला आहे प्यारी

शिळी भाकरी खाताना वाटतं लई भारी

ना उद्याची चिंता ना काळजी

पोरांना जवळ घेऊन निजते माऊली-----


कधीकधी चंद्रमौळी झोपडीही नसते नशिबात

दोन वेळचा भाकर तुकडाही नसतो ताटात

तरीही नुसते पाणी पिऊन ढेकर देतो आनंदात

उपाशी पोटी स्वप्न पडतात छान-----


खरं सांगूका तुम्हाला

आमच्या दुनियेत आम्हीच आमचे राजे

परिस्थितीची ना खेद ना खंत

तेव्हा आम्ही च असतो तुमच्या पेक्षा श्रीमंत-------



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational