गरिबीची व्यथा
गरिबीची व्यथा
लागलेली भूक, नसलेले पैसे,
हताश झालेले परिस्थितीमुळे मन
पोटाच्या आगीसाठी चाले मैल न मैल
दिवसरात्र पावलांची वणवण
जन्मास येते गरिबी कोणाची चूक आहे?
विझवण्यास आग पोटाची भेटायला भाकरीला
निघते ती भूक आहे
भूक,तहान, कपडा यासाठी
नेहमीच होतात त्यांच्यावर अन्याय
गरिब कायम गरिब रहावा हा कुठला हो न्याय?
प्रश्न अनेक सोबतीला गरिबी सोबत येतात तरी
कष्ट करून मिळवतात चटणी अन् भाकरी
भीक लाचारीची कुणाकडे मागत नाही
स्वाभिमान त्यांचा ते कधीच सोडत नाही
सत्य सोडून खोट्यास कधी जाणत नाही
जात धर्म भेद मानत नाही
गरिब घरात जन्म झाला
तर काय झाले,
ध्येय अवघड आहे म्हणून
अर्ध्यावरती खचून जात नाही
ध्येयप्राप्तीसाठी आभाळाला
गवसणी घातल्याशिवाय ते राहत नाही
अविरतपणे चालत राहतात
संकटाला कधी भीत नाह
खंत एकच 'गरिबीची व्यथा'
सहसा कुणाला का बर कळत नाही?
