गर्भातले अंकुर
गर्भातले अंकुर
गर्भातले अंकुर फुटण्याआधिच नष्टते
काय अपराध त्याचा जन्माआधीच खुंटते
वात्सल्यतेचा झरा कसा काय गोठतो
स्त्री असोनी त्याचा सर्वनाश होतो
समाजातले अस्तित्व सिद्ध केले कित्येकिंनी
चुणूक तिच्या हुशारीची चंद्रावरही दाखवली
आंतरराष्ट्रीय झेंडा विजयाने फडकवला
घरा बरोबरच देशही संभाळला
कोणत्या क्षेत्रात उणीव नाही तिने ठेवली
गानकोकिळा ही आदराने संबोधली
वेेळ आली आता तुझेच डोळे उघडण्याची
या पापाचा बळी ठामपणे नाकारण्याची
अंकुराचे रोप होईल कळ्या फुलांनी बहरेल
पाषाणाला पाझर फूटून माळरानही फुलेल
संस्कृती भारताची यासाठीही नावाजेल
इतिहासात याची नोंद सुवर्णाक्षराने नोंदे
