गोळवलकर गुरुजी...!
गोळवलकर गुरुजी...!
माधव सदाशिव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४०–इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला.
संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.
मा नवता वादी जीवन आपुले
ध वल यशाची परंपरा
व सुंधरेस देऊ मातृभूमीचा सन्मान
स गळे आपण एकची मानव
दा खवू विश्वास स्वाभिमान
शि स्तबद्ध आचरण
व जनदार व्यक्तीत्व राखू
गो मातेचे संगोपन आपण
व नसंवर्धन करुनी करू
ल य जीवनाची अतूट ठेवण्या
क र बाही मागे सारू
र सरसते तारुण्य आपले
गु रुआज्ञेने खर्ची घालू
रु क्ष जीवनातही आता
जी वन चला पुन्हा फुलवू
जीवन चला पुन्हा फुलवू..!
परमपूज्य राष्ट्रऋषी गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
