STORYMIRROR

Shila Ambhure

Children Fantasy

2.3  

Shila Ambhure

Children Fantasy

गणपती गजानना

गणपती गजानना

1 min
19.5K


गणपती गजानना

देवा लवकर ये रे।।धृ।।


पार्वतीचा नंदन तू

अंगमळीचा बनला

सुपावानी कान तुझे

हत्तीपरी सोंड तुला

मंगलप्रसंगी तुझा

देवा प्रथम मान रे।।१।।


दूर्वा आणिक जास्वंद

आघाडा तुज आवडे

लाडू पेढा गोडधोड

खाण्या मूषक बागडे

मोदकाचे ताट पुढे

गणेशा प्रसाद खा रे।।२।।


भाद्रपद मास येता

होते तुझे आगमन

दहा दिवस राहुनी

मग होई विसर्जन

तुझ्या उत्सवात आम्ही

करितो खुप मजा रे।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children