गंध मातीचा
गंध मातीचा
गंध मातीचा असा
दरवळे रानोरानी
पहिली सर पावसाची
पडता काळ्या रानी ।।
येता मृगाचा पाऊस
गंध मातीचा दरवळे
चाहूल रे मिरगाची
माझ्या बळीला कळे ।।
पडता सरी रानात
गंध धरेचा वाहे
घेऊन अत्तर सुवास
रान वारा ही वाहे ।।
रान वारा वाहतो
गंध मातीचा घेऊन
वनराई ही नटली
शालू हिरवा लेऊन ।।