गझल
गझल
चूक माझी
जगाने कधी पाहिली भूक माझी
दिसू लागली तेवढी चूक माझी...!!
तुला फक्त दिसे हे उदासीन होणे
कधी थांबली का पिळवणूक माझी?...!!
नवा जोश आला पुढारी जणाला
सत्तेचा नशा ही करमणूक माझी...!!
उशीरा कळाले तुझे शब्द काही
किती होत होती छळवणूक माझी...!!
दिली फार शिक्षा जरी या जगाने
तुला प्रेम करणे कशी चूक माझी ?.. !!
कधी येत नाही बहर या झाडाला
कथा नीसर्गालाच ठावूक माझी...!!
करीतोस कान्हा मथूरेत खोड्या
दही रोज खाण्या अडवणूक माझी...
मुखवट्यात रामास बघते कधी मी
अकारण अशी का फसवणूक माझी?..
अबोला सरावा कुणा माणवाशी
कळू लागली भावना मूक माझी...
नसीबात खाचखळगे आजमाया
असे दीनराती चुकामूक माझी.....
कधी ही कळेना पराभव कुणाला
खटकते मनाला सदा हूक माझी...
मनाने पुजावे कन्हैया स्मरावे
भक्तीही निराकार भावूक माझी....
कितीदा असा भार अटीवर टिकावा
मुळातच दिसेना कधी चूक माझी...
