STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

गझल

गझल

1 min
695


माझ्या मनी सुखाचा मनमोर गात आहे

सरलीत दुःख सारी वास्तव ज्ञात आहे।


सांगा फुलास ही दररोज वेचताना

दैवात जगणे ऐसे जे क्षण नेत आहे।



अश्रुच धीर देती दुःखास सोसताना

धैर्यास जितवाया मी स्वप्नील गात आहे।


कोरीव काम जैसे आयुष्य जाणताना

माझ्याच अहंकारा सोडून जात आहे।


किर्र तिमीर राती भयकंप दाटताना

आधार स्पंदनांचा मज धीर देत आहे।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational