STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

घर...!

घर...!

1 min
27.4K


घर...!!!

घर असावे घरासारखे

नकोत नुसत्या भिंती

कळते प्रत्येकाला

जीवनाच्या अंती...


संस्काराची बीज पेरणी

खुल्या किनारी होते

दूर क्षितिजावर

मज ती बहरलेली दिसते...


गालावरच्या स्मित हस्याची

साक्ष मला पुरते

सत्कृत्याची अशी किमया

जीवनी सहजी खुलते...!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational