STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

घर पाहावे बांधून

घर पाहावे बांधून

1 min
451

संसाराची सुरुवात होते जेव्हा

स्वप्न घराचे अंकुरते मनात

एक एक काडी जमवतो

माणूस राबून उन्हातान्हात


स्वप्नांचे इमले असतात उंच

गाठोडं असते नेहमी तुटपुंजं

पाया मारतो घेऊन मग कर्ज

स्वेच्छेने शिरी येते हौसेचं ओझं


विटेवर चढते वीट थर मनावर

स्वप्न बांधताना तो नसतो भानावर

माती, सिमेंट, चुना सगळं चालतं

वाढणारं घर त्याच्याशी होतं बोलत


आपलंच घर जरी काही मागत नाही

हातातल्या पुंजीवर कधीच भागत नाही

हातातल्या गोष्टी जातात हाताबाहेर

घर बांधण्याआधी घरचाच मिळे आहेर


जमेल तशी एकेक वीट जोडतो सांधून

कधी चिमटा पोटाला कधी खातो रांधून

सोपं नसतं घेणं स्वत:च्या हातावर गोंदून

म्हणून म्हणतात... एकदा घर पाहावं बांधून!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational