घर कौलारु
घर कौलारु
हिरवा निसर्ग भोवताली
रानो पानी फुल्ल्या वेली
गुज ऐकती का ते कोणी ?
दबके बोल ते घर एकाकी
उंच डोंगर राशी सभोवती
हिरवळ दाटली भोवती
मध्यावरती घर कुणाचे ?
निसर्गप्रेमी लोक राहती
या डोंगराच्या मध्यावरती
दैवी रचनांनी ही भरलेली
असावी का ती मानवी रचना
जणू चारखाणी बांधल्या भिंती
काडी मोडी जमा करुनी जशी
चिमणी पाखर घरटं बांधती
व्हावे शेजारी का जुळावे नाती ?
डोंगर राशी अन निसर्संगती
वाट पाऊले वळणाची चालती
मातीवर पाऊलखुणा उमटती
का ती सांगती माझे काही ऋण ?
तेच मनी बाळगून घर बांधती...
वादळ वार पाऊसधारा झेली
दारी तुळस अंगणी फुले वेली
राहिल ना अशीच किमया की?
विखुरेल तेही होईल स्वप्नवेली
घर कौलारु स्वप्नी पहिलं ते
दाट हिरवळीसंगे मी राहते
क्षण सौख्याचे होतील का खरे ?
आकांक्षा मनीची निसर्ग जपते
