Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Yogita Takatrao

Inspirational Others

3  

Yogita Takatrao

Inspirational Others

घननिळ्या श्रावणात

घननिळ्या श्रावणात

1 min
35


उधळीतो रंग सारे

पुण्याईचा श्रेष्ठ मास,

ओसंडून वाहे बघा

भक्तीभाव, प्रेम, आस!.......१


मोहरून वसुंधरा 

बहरले धुंद रान,

घननिळ्या श्रावणात

सृष्टी देई वरदान!............२


सुख-दुःख छाया भासे

लपंडाव नभांगणी,

खेळ ऊन पावसाचा 

कोण घडवी मांडणी!......३


सृजनाचा काळ वाटे

लुब्धावतो रंगकारी,

क्षणो क्षणी बदलते

रूप असे चमत्कारी!........४


खळाळतो चैतन्याचा

धबधबा उल्हसित,

सरी संगे पीत छटा

मन करे प्रफुल्लित!..........५


सूर्य किरणे कोवळी 

मृदू मखमली धारा,

अंगावर शहारतो

सुखदायी थंड वारा!..........६


Rate this content
Log in