STORYMIRROR

veena joshi

Drama Tragedy

3  

veena joshi

Drama Tragedy

घेशील का रे समजून!!

घेशील का रे समजून!!

1 min
177

थकला रे जीव माझा आता

संसार हा सगळा सांभाळता

घेशील का रे समजून सख्या 

मेटाकुटीस आले आता .....

लगबग ही जीवाची थांबता थांबेना

स्वस्थ कोठे बसू म्हंटले तर वेळ तो पुरेना 

केवळ लगबग नि लगबग

थोडा मिळता सहारा तुझा

आवडी जपेन माझ्या

राहिल्या अजूनही अपूर्ण

साठी वयाची ती गाठता

घेशील का रे समजून मला

थोडा वेळ देशील का?

अतृप्त माझ्या आत्म्याला तृप्त

तू करशील का?

नको मला दागदागिने

नको तो पैसा अडका

हवासा तू जवळ नि

हसण्याचा तो गोंधळ आता

ए खरचं समजून घेशील ना?

छोट्याशा या संसाराला 

अमर करून सोडशील ना!!

सोडशील ना !! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama