STORYMIRROR

veena joshi

Romance

3  

veena joshi

Romance

प्रेम

प्रेम

1 min
183

प्रेम हे जीवन असतं

दोन जिवांच मिलन असतं

परमेश्वराने निर्मिलेल्या

अवनी वरच स्वप्न असतं


ना कशाची आसक्ती

ना कोणता तिढा

दोन जिवांच्या मिलनाचा

 असतो फक्त ओढा


रणरणत्या उन्हात

गरमीचे तांडव

होईल कशी भेट

नुसते विचारांचे मांडव


संध्या समई भेट

आली दोघांची घडून

दोघेही निःशब्द

 न येति शब्द भडभडून


ऐकण्या अधीर

शब्दांची उत्कठता

पण!स्पर्शानेही थांबली ती

जीवाची नुसती तगमगता


अस्ताच्या रविसमोर

घडलेली थेट

देईल का स्थित्यंतर मना

प्रेमाची ही भेट



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance