STORYMIRROR

veena joshi

Others

3  

veena joshi

Others

मोगरा

मोगरा

1 min
11.7K

हिरव्याकंच पानावर

शुभ्र धवल मोगरा

क्षणभर का होईना

वेधून घेसी नजरा


सजीव म्हणतात न रे तुला!!

मग ऊन कस जाणवत नाही

थोडीही खंत त्याची

तुझ्या पानांवर दिसत नाही!


एवढी सोशिकता कशी?

कर ना माझ्याशी करार

मिही अनुकरण करेल

मानेल तुझे आभार!!


याच दिवसात तुझे

सौंदर्य कसे खुलते

लग्न समारंभात कशी

वा! वा!ची दाद मिळते


दे ना रे!! मला थोडी

तुझ्या जवळची सोशिकता

वाटेल मलाही गार गार

बदलेल माझी मानसिकता


Rate this content
Log in