STORYMIRROR

veena joshi

Others

3  

veena joshi

Others

काळी माती व बळीराजा

काळी माती व बळीराजा

1 min
187

राब राब राबतोसी

नसे खाण्यचीही भ्रांत

कसा बनलास रे तू?

तुझ्यावरच का संक्रांत 


आई समान मातेची

करी सेवा रात्रंदिन 

काळ्या माते वीण कसा

जात नसे तुझा क्षण


पीक येण्याच्या बेतात

असे तूच आनंदात

अवकाळी पाण्यानेच

जावे लागतसे दुःखात


पोटा चिमटा देऊनी

करतोस फवारणी

रात्रंदिन तुज चिंता

फिरतोस ना अनवाणी


सावकार आणि आप्त

नसे कुणा कळकळ

ओंदा फिटेल का कर्ज

मना कशी तळमळ


हौस मौज हसी मजा

 घरातून सारे पसार 

लग्न कार्याचा घराला

जणू पडला विसर


नको भगवंता छळू

काढ काही तरी मार्ग

कधी तरी त्याच्या घरी

भासू देना रे तू स्वर्ग!!



Rate this content
Log in