STORYMIRROR

veena joshi

Tragedy Others

4  

veena joshi

Tragedy Others

पाऊलखुणा

पाऊलखुणा

1 min
539

पहाटेच्या समयाला

निघतो तो जायला

पोटाच्या खळगीचा

विचार असतो मनाला


बाजूला पोरगं कसं

बा बा करत असतं

त्याचं मात्र ध्यान

त्याच्या कड नसतं


अनवाणी घागर घेऊन

निघे तो शेताला

पाऊलवाटा तुड वणे

असे त्याच्या नशिबाला


बापाच्या पाऊलखुणा

पोराला दिसत असे

त्याच्या मागे जाणे

सद्या मात्र शक्य नसे


सावली साठी तो

बसे वळचणी खाली

पोरगा मात्र बाजूला

पाऊले त्याची न्याहाळी


अनवाणी चालून चालून

पडल्या भेगा पायाला

काटे कुठे तुडउन

कुरूपे झालीत त्याला


बापाच्या पाऊलखुणा

गेल्या पोराच्या डोक्यात

विचार मग्न तो राही

लक्ष लागेना कशात


मोठा होऊन बापाचा

भार हलका करायचा

थकल्या भागल्या जीवाला

आराम थोडा द्यायचा


मोठा होण्याचे स्वप्न

मनातच राहिले

अचानक मायबाप

त्याला सोडून गेले


आजही पाऊलखुणा

येती त्याच्या स्वप्नात

दरदरून घाम येतो

भिऊन उठतो मनात



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy