Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

veena joshi

Others

3  

veena joshi

Others

हे गजानना...

हे गजानना...

1 min
544


प्रभाती प्रभाती/नाम तुझे देवा

वाटतो गोडवा/घेताना रे!!


भक्तांची सावली/, मायेची माऊली

मनाला भावली/ मूर्ती तुझी


शांत भावमुद्रा/निश्चल शरीर

दिसे ती नजर /भक्तावरी


नाही दुजा भाव/ नसे थोर सान

कशाचे न भान/ तुझ्या ठाई


माय माता येती/ आस असे मनी

होई पूर्ण जनी/ सांगतसे


संकटाशी मात/ करण्या दे साथ

हाच माझा नाथ/ गजानन


गजानन माझा /असे हा सर्वत्र

मुखी असे मंत्र/ नित्य त्याचा


असू दे रे कृपा/ सर्वावर दाता

तूच माझा त्रात्रा /गजानन


गजानन ग्रंथा/स्मरता स्मरता

अश्रू हे झरता/थांबेचना


करोन आरती/ ठेवोनी मस्तक

 मानी मी रक्षक /तूलाच रे


 सुखा समाधाने /करुनि दर्शन

मनी समाधान/लाभले रे


Rate this content
Log in