STORYMIRROR

veena joshi

Others

4  

veena joshi

Others

मागे वळून पाहताना

मागे वळून पाहताना

1 min
705

भूत भविष्य वर्तमान

कालचक्र कसे निसर्गाचे

या चक्रातून अवघे सजीव

कधी दूर न राहावयाचे


सोनेरी क्षण भूतकाळाचे

मनी साठवून ठेवायाचे

वर्तमान जातो आनंदात

भविष्य मात्र स्वप्ने रंगविण्याचे


भूतकाळातील कटू आठवणीचा

न होतसे देवा ऱ्हास

भविष्यकाळ कसा असेल?

लागली चिंता नि आस


आठवणींच्या गर्दीत

 असता

उगवला तो वर्तमान

भूतकाळाचा विचार करत 

अनुभवला हर एक दिन


वर्तमानाशी घालुनी सांगड

स्वप्न रंगवली कशी

स्वप्न साकार होण्याची

वाट पाहते मी जशी


नसे स्वप्न पै पैशाची

दागिन्यांचे तर मुळी नसे

कलात्मक दुनियेमध्ये

सदा जाऊनी मी वसे


धीर गंभीर समुद्र

कातर वेळ ती कशी

निसर्गाच्या सोबतीत

स्वप्नांवर स्वार मी जशी


उतरले सत्यात स्वप्न

 काव्यमय झाले जिवन

भूतकाळातील कटू आठवणी

झाल्या धूसर न ये आठवण


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍