STORYMIRROR

veena joshi

Inspirational

4  

veena joshi

Inspirational

आई

आई

1 min
256

आठवण ती आईची

मनी नेहमी राहावी

दूर जाता आई वाटे

अजून ती हवी हवी


गेले बाबा ते सोडून 

सांभाळले तिने आम्हा

अर्धी भाकरी खाऊनी

ठेवी कशी तृप्त मना 


प्रेम देऊनी अवघ्या

आपलेसे केले जना

दिर भावजय भाऊ

खात नसे तिच्या विना 


सांजवत रामरक्षा

असे तिचे तोंड पाठ

तिच्यामुळे ते आम्हीही

जगी कसे आज ताठ 


केले कष्ट अतोनात

फळ मिळे त्याचे रास्त

मुले मुली ती शिकून

ज्ञानाने समृद्ध मस्त 


तिच्या जाणती भावना

अपमान न करती 

आयूष्याचे ते कल्याण 

 समाधानी यातच ती 


आठवणी त्या आईच्या

चिरकाल स्मरणात

 व्हावयाच्या न धूसर

आठवती त्या क्षणात 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational