समरांगणीचा शिवसूर्य
समरांगणीचा शिवसूर्य
1 min
367
राजे तुम्हीच होते हो
या महाराष्ट्राची शान
महाराष्ट्र घडविण्यास
तुडवले सारे रान
दऱ्या खोऱ्या समुद्र किल्ले
गनिमी कावा शत्रुसी लढणे
ध्यास एक हिंदवी स्वराज्याचा
देत होते आपणास मरूनी तरणे
बलाढ्य शत्रु अपुरी फौज
रयतेचे रक्षण संकटे मार्गात
नाही डगमगले राजे तुम्ही
शिरी होता जिजाऊचा हात
गोर-गरीब माता-भगिनी
आबाल-वृद्ध चिंतित जनता
शत्रूंनी माजवली अराजकता
अवर्षणाने त्रस्त भूमाता
राजे सर्वांवर करुनी मात
फडकवला भगवा घातली साद
भवानी मातेने दिला आशीर्वाद
आणि म्हणून!
आणि म्हणून!!
राजे आजही सर्वदूर तुमचा नाद!!!
जय जय महाराष्ट्र माझा...
