घे भरारी..
घे भरारी..
अंधळ्या जगाची रित ती अंधळी
बंदीस्त दरवाजे, संस्कृती ती बेगडी
जिथे स्विकारली बंधने हि स्वखुशीने
वेशीवर टांगली अस्तिवाची ती लक्तरे
पैजणाच्या नादात कैद होतात वादळे
पंखात बळ देते ती सावली विचारते
उंच नव्हते आभाळ ,पंख काहून थकले
भरारी ना घेतली, का माघार पावलांची
का संस्कारची नाव आज तुझी बेडी ठरली
बंदीस्त आहेत कवाडे अजूनही या मनिचे
हृदयी भाव का जागतो सागराच्या त्या ओढीने
खुणवते मज आजही दुरावलेली वाट ती पुराणी
भावनिक अन स्वप्नाची अदृश्य अशी कहाणी
अस्तिवच्या खुणा वेचती सल रुजते का मनी
प्रश्न तोच नित्याचा विचारतेय नवी पहाट ही
भयाच्या गर्तेत हरवलीस कोठे ओळख जुनी
नको का वाटते नव्या अकाशीचे चित्र मनी
नको का वाटे भयाच्या आव्हानला पेलने
ते दार भयाचे उघडुनी घे भरारी या नभांगणी
विश्वासाचे शब्द तूझे सोबती ,हत्यार ही लेखणी
मग का भय तुला नीयतीचे ,दे अंगार ही पेटवूनी
