गड किल्ले
गड किल्ले
रांगा सह्याद्री
बहरलेली रंगीबेरंगी फुलं
हिरवागार गालीचा
कुठं अवघड घाट
चढ, उतार, उंच उंच सुळके
अस्वस्थपणे इतस्तता पहुडलेले
त्यांना कोरुन कोरुन केलेल्या पायऱ्या
प्रत्येक पायरीवर विसावलाय इतिहास
वर मोकळं ढाकळं आभाळ पसरलंय
समोर दिसतोय एक टोक
टोकावर विसावलाय किल्ला
त्या किल्ल्याला मुजरा माझा
झुकली मान जोडला हात
वीरश्री संचारली अंगात
लावला टिळा इथल्या मातीचा
आठवण झाली महाराजांची
कानांत त्या नौबती न् नगारे घुमू लागले
डोळ्यांसमोर मावळ्यांची धावपळ तरळू लागली
अपसुकच शब्द आले
जय भवानी जय शिवाजी
