गाव दिसला
गाव दिसला


लोकांना गर्दीच दिसली मंदिरात भक्तांची
मला तर त्यात पण माझा देव दिसला
हाती भक्तांच्या फुलांचे हारतुरे, प्रसाद होता
देवाला त्यांच्या मनी समर्पणाचा भाव दिसला
मला तर सारे आपलेच सवंगडी वाटले
पण कुणाला रंक कुणाला राव दिसला
जीवन होतंच काय तर सुखदुःखाचा
बुडबुडा यात अजून एक जण फसला
पैशासाठी शहराचा रस्ता पकडावा लागला
मायेसाठी फक्तच मला माझा गाव दिसला