गारवा
गारवा
प्रेमाची ओढ लावणारा
अंगावर शहारा आणणारा
गालांना नकळत छळणारा
म्हणजेच तो गारवा.....
नाकालाही झोंबणारा
दातांनाही कडकवणारा
गादीत निजायला लावणारा
म्हणजेच तो गारवा....
पहाटे नकोसा वाटणारा
परंतु गोड साखरझॊप देणारा
आळसालाही मित्र बनवणारा
म्हणजेच तो गारवा.....
वर्णन करताच न दिसणारा
शेकोटी पासुन दूर धावणारा
अग्नी विझण्याची वाट पाहणारा
म्हणजेच तो गारवा.....
गार गारवा म्हणत सुटणारा
हातांवर हात घासायला लावणारा
न बोलताही दात वाजवणारा
म्हणजेच तो गारवा.....
गरम भजींची ओढ बनणारा
चहांच्या सुरक्यात मजा देणारा
मनाला क्षणभर आनंद देणारा
म्हणजेच तो गारवा.....
हो हाच तो गारवा.....
