गानसाम्राज्ञी लता मंगेशकर
गानसाम्राज्ञी लता मंगेशकर
ओंजळीतून काळाच्या मोगरा
ओघळून गेला कसा हो आज
गंध स्वरांचा अनमोल सारा
करून हृदयाहृदयावर राज ॥ १ ॥
श्वासाबरोबर म्हणावा कसा
हरपावा तव कंठातला सूर
भेदून गेला क्षितिज तो असा
विश्व अंतःकरणी जो सर्व दूर ॥ २ ॥
घालता अशी मोहिनी आवाजाची
षट् दशकाची स्वर वाटचाल तुझी
राहील सकल जगतावर ती ताजी
घालत आमुच्या मनामनात रूंजी ॥ ३ ॥
अनंतात विलीन होण्या चालला
आत्मा तव अगम्य त्या प्रवासास
भाव ओला गहिरा हिंदू हृदयातला
निशब्द कसा त्या कातर स्वरास ॥ ४॥
गाण कोकिळा तूची गाण साम्राज्ञी
अजरामर तू जोवर चंद्र सूर्य चराचरी
करतील राज हरेक तुझीच गाणी
वेळोवेळी अबाल वृद्ध सकलांतरी ॥ ५ ॥
