शान तिरंग्याची ....
शान तिरंग्याची ....
मोल बलिदानाचे त्यांच्या ठेवूनी मनी ,
चला आता स्वाभिमानाने जगू या
उंच नभी तिरंगा फडकताना पाहूया ॥ध्रुव ॥
स्वातंत्र्यासाठी लढले जे प्राणपणाने ,
सार्थक त्यांच्या बलिदानाचे करू या ।
लढता लढता ज्यांना वीरमरण आले ,
स्फुल्लिंग त्यांचे हृदयस्थानी कोरू या ॥ १ ॥
चहूबाजूने प्रयत्न आक्रमण देशावर,
हाणून पाडल्या चीन पाकच्या कारवाया ।
घुसखोर कोरोना महामारी समूळ संपवण्या
चला साथ सरकारी यंत्रणेस देऊ या ॥ २ ॥
कसा साहू, अंतस्थ पोखरला देश आता,
हवे आता देशद्रोही राजकारण संपवाया ।
सोडू मतभेद सारे ,एकसंध भारत घडवाया ,
समतेचा मंत्र आता चला अंगी बानू या ॥ ३ ॥
वेळ आता कोण सच्चा कोण लफंगा,
सद् विवेके त्या जाणून आता घेऊ या ।
बोलणे एक कृती एक, कृत्ये काळी भ्रष्टाचारी ,
मूठमाती त्या राजकारण्यांना देऊ या ॥ ४ ॥
निस्वार्थ सेवा,स्वप्न मनी अखंड देशाचे ,
चला एकजुट पाठिशी उभे त्यांच्या राहू या ।
जरब मोठी या देशाची सकल जगावर ,
अभिमान आम्हा, तिरंगा गगनी चढवू या ॥ ५ ॥
