STORYMIRROR

Vilas Kumbhar

Inspirational

3  

Vilas Kumbhar

Inspirational

बोलू कौतुके

बोलू कौतुके

1 min
219

  अभिमाने बोलती बोल इतुके ,

     ज्ञानेश्वरीचि बोलिले जे ।

     माझ्या मराठीची बोलू कौतुके ,

     पैंज अमृताशीही जिंकेल ते    ॥ १ ॥


     ऐसी ज्ञानदेवेचि दिधली अमृतवाणी ,

     ब्रह्मविद्याच जणू आली मराठी होऊनी ।

    अभंगातून त्यांच्या आली पहा प्रगटोनि,

    जयाने सांगितली देवभाषा सोपी करोनि ॥ २ ॥


     सार जीवनाचे सहज सोपे करोनि दिधले,

    आद्यात्म ज्ञानामृत ज्ञानेश्वरीतून पाजिले ।

     मानव कल्याणार्थ भगवंता आळविले ,

     विश्वसुखासवे प्रार्थना पसायदाने केली ॥ ३ ॥


     ज्ञानेश्वरे जे जे लिहिले,बोलिले, उपदेशिले,

    ते ते वंदिले,सकल जगाने तया मान्य केले ।

     अध्ययनी मान मिळता विदेशीही गौरविले ,

     आद्यात्म ज्ञानवारे अखिल विश्वात पोहचले ॥ ४ ॥

   

    प्रवचन कीर्तनातून पतित पिडीतासी तारले,

     रसाळ मधूरवाणीतून जनजागरण कार्य केले ।

     जतन करूया,पुढे नेऊया मराठी शब्द शेले,

     मराठीचिया बोलू , रत्न जे ज्ञानिये दिधले ॥ ५ ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational