नि चंद्रही लागला बोलू
नि चंद्रही लागला बोलू
अजून आठवे ती रात्र धुंद चांदण्याची, साक्ष होती तुझ्या नी माझ्या मिलनाची
झावळीतून झिरपणा-या चंद्र किरणांची , गुंफताना सुखस्वप्ने ती भावी जीवनाची
नीरव होती शांतता, शितल होते चांदणे अवघड होते शब्दात भाव मनीचे मांडणे
वाढत होती क्षणाक्षणाला हृदय स्पंदने, कितीदा विरले ओठांच्या ओठात सांगणे
हळूच घेता हातात हात, रोमांच तरल तनू, लाजली क्षणिक, नि चंद्रही लागला बोलू
प्रेमरस चांदण्यातून लागावा झिरपू जणू , चंद्रचांदण्या साक्षीने लागे मनमोर तो डोलू
विश्वासात प्रेमाच्या खुलता आकाशी इंद्रधनु ओढ अनामिक मग लागे अतूट त्या बंधनाची
बद्ध होता भवसागरी नव उर्मीच मिलनाची उपमाच त्या तद्रुपासी परिमल नि चंदनाची

