लेक आली माहेरासी
लेक आली माहेरासी
लगबग पहा उडे ,
लेक येणार माहेरी .
डोळे लावी वाटेकडे ,
भाऊही बहिणी परि ..॥ १ ॥
टपाल हाती पडता,
आले उधाण आनंदा .
बहू दिसा लेक येता ,
नाचे घरदार मोदा ..॥ २ ॥
घोंगडीचे अच्छादने,
सजला बैल छकडा .
बहिणीस घेण्या सवे ,
निघाला भाऊ भाबडा..॥ ३ ॥
वाट पाहे भाऊराय,
उभा हम रस्यावर .
लालपरीनेच त्याची
ताई लाडकी येणार ..॥ ४ ॥
लेक येता माहेरासी ,
भासे दिवाळी दसरा .
संतोष आई बाबासी ,
सुखी पाहता पाखरा...॥ ५ ॥
राहिल्या आठवणीच ,
पाणावती डोळे आता .
भासे स्वप्नवत सारे ,
दुस्तर माहेर,भ्राता..॥ ६ ॥
नाती झाली स्वार्थी सारी ,
प्रेम,स्नेह नावासाठी.
भाव खोटा अहंकारी ,
माहेरपण स्वप्नगोष्टी..॥ ७ ॥
