STORYMIRROR

Vilas Kumbhar

Others

4  

Vilas Kumbhar

Others

ऐसी माय माझी

ऐसी माय माझी

1 min
381

हांड्यावर हांडा, वर कळशी ,

      घेऊनि बघा माथ्यावर ,

      माय माझी निघाली पाण्याला .......... .॥ ध्रु ॥


         चालली पायवाटेवरून ,

     वर तप्त पोळणारे उन्ह, 

     पाण्यासवे झपाझप जाय,

     कोसावरच्या विहिरीला....... ॥ १ ॥


विहीर गावकीची होती मोठी ,

    शेंदण्या पाणी रहाट तीन .

     होती रांगही तेथे पाण्यासाठी ,

     भाग पडे थोडे थांबण्याला ............॥ २ ॥


         फासागाठ दोरीची कळशीला ,

         बांधून सरसर सोडी विहीरीत .

         दांडा रहाटाचा करी खालीवर ,

         बुडू देण्या पाण्यात कळशीला.....॥ ३ ॥


    पाणी कळशी कळशीने शेंदून, 

    भरीले हांडे पाण्याने दोन .

    कळशीही शेवटी घेई भरून ,

    ठेवी चुंभळ डोई भार पेलण्याला...........॥ ४ ॥


        तीन भांड्यांचा डोई पेलत भार ,

        माय माझी घरा निघे माघारा . 

       ईतक्यात आले भरून आभळ, 

       लगबग तिची घरी पोहचण्याल्या ....॥ ५ ॥


अचानक सुटला वादळ वारा ,

चक्री गोलगोल घेत पाचोळा .

जीव मायीचा झाला घाबरा, 

सावरी जिकीरी हांडे कळशीला..............॥ ६ ॥


      लटलट कापता वाऱ्याने पाय ,

      शंका मनी कशी पोहचेन घरी .

      पावसाच्या सरी त्याही अनावर ,

      भयगोळा पोटी फिरू लागला .......॥ ७ ॥


चिंब चिंब पावसात भिजलेली ,

वाट चिखला चिखलात तुडवीत .

माय माझी महा सायासे परतली ,

जीव मग साऱ्यांचा भांड्यात पडला ........॥ ८ ॥


       किती स्मराव्या मायीच्या कष्टकथा ,

      जगण्यातला अर्थ तिनेच शिकवला .

      कष्टविता स्वतःला आम्हा संस्कारिले ,

      साश्रू नयनाने वंदन त्या मातृ चरणाला ....॥९ ॥


Rate this content
Log in