Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vilas Kumbhar

Children

3.9  

Vilas Kumbhar

Children

जाऊदे ना बाहेर.....

जाऊदे ना बाहेर.....

1 min
281

आई बघ ना थांबला वारा ,

येतील गं आता टपटप धारा ...॥ध्रु ॥

आई, जाऊ देना बाहेर जरा, 

उरकला अभ्यासही सारा .

सुटलाय बघ गोडगोड वारा ,

अंऽऽ आई चल जाऊ बाहेरा .....॥ १ ॥

करू गं पटपट कागदी नाव ,

अलगद सोडेन ती पाण्यावर.

हात धरून घेऊ पावसात धाव,

झालंच तर वेचू मिळून गारा .......॥ २ ॥

आई आई सुरू झाला गं पाऊस ,

पोरही बघ घालताहेत धुडगूस .

नको आता तरी मला थांबवूस ,

आवरू आल्यावर सारा पसारा....॥ ३ ॥

हळूच घेतली आई गालाची पप्पी ,

आई आई म्हणत गच्च मारली मिठी ,

विरघळत ती जा म्हणताच दिली झप्पी ,

धडक मीही केला लगेच पोबारा...॥ ४ ॥

पाऊस धारात भिज भिजलो ,

मनमुराद पाण्यात नाचनाचलो. 

इकडून तिकडून पळत सुटलो ,

मनच होईना जाण्या घरा माघारा....॥ ५ ॥

Rate this content
Log in

Similar marathi poem from Children