गाणे गात जगावे
गाणे गात जगावे
दौतीतील शाई नको, अक्षर अक्षर जपले पाहिजे
करंड्यात कुंकू नको, सौभाग्य निरंतर जपायला पाहिजे (१)
माणसे येतील जातीलही, माणुसकी जपली पाहिजे
माणुसकी संपल्यावर माणूसही संपला पाहिजे (२)
संपत्ती मिळत असते, मिळवलेली जपली पाहिजे
लपवून कोंडून काय उपयोग, मनाजोगती भोगली पाहिजे (३)
गाणे गात गात जगावे, जगण्याचे गाणे व्हावे
जगण्यापलिकडले गाणे मनात, मनात खोल गुणगुणावे (४)
त्याच कोशात गुरफटून उरलेली जिंदगी संपवावी
अंतिम क्षणी त्या गीताची एक ओळ तरी आठवावी (५)