गाजर ! ( मालवणी )
गाजर ! ( मालवणी )
का कसे
कोणास ठाऊक
माका म्हणाले हे
येतस काय गो फिरूक ?
तूका मुंबईक नेतय
चौपाटी दाखवतय
अन् भेळ पुरी
खाऊक घालतय
राणीचो बाग
दाखवतय
हत्ती सोबत
फोटो काढतय
वाळकेश्वराच्या
बागेत नेतय
छान म्हातारीच्या
बुटात बसवतय
महालक्ष्मीच्या
दर्शनाक नेतय
आकाशात ऊंच
चक्रावर बसवतय
आरे कॅालनीत
सहलीक नेतय
गाई म्हशीचे
तबेले दाखवतय
असा म्हणान
लगबगीने गेले भुतूर
बॅग भराक लागून
निघुक झाले आतुर
मी मनांत म्हटलंय
आज खय उजाडला
पावशेर घेउन ईलेत
की भूताने झपाटला
समजूक नाय
कायव एक
नक्कीच असतली
नवीन मेख
म्हणान मगे मी
वरवर हसलय
विश्वास बसलो
असा दाखवलय
मनात म्हटलंय
बघुया तरी
काय गोम असात
ती शोधुक व्हयी
थोड्या वेळात खळ्यात
पाहुण्यांचो ईलो आवाज
बघतय तर काय
सासूचो दिसलो साज
तरी मी म्हटला
ह्यांचा खय उजाडला
आवशीक सांभाळुचा व्हता
म्हणान माका गाजर दाखवला !
