STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

फ़िनिक्स...!

फ़िनिक्स...!

1 min
13.8K


कोळसा मनात रुतला

अंगार तसाच आहे

राख उडते नभी

आग उरी तशीच आहे....!


चटके कित्येक सोसले

चटक्यांचे डाग तसेच राहिले

वाटले मज तेंव्हा

उगाच त्यागाचे फुल फुलले.....!


कनवटीशी काही

आता काहीच नाही उरले

तरी नशीब चांगले

आजवरी होते ते पुरले.....!


आता सल त्या दिसांची

भेडसावते मनाला

काय सांगून उपयोग

ते या बेगडी जगाला....!


आतला अंगार पुन्हा

प्रज्वलित होत आहे

फ़िनिक्स पक्षाप्रती

तो झेप घेत आहे....!


ध्येय या जीवाचे

अंतर्मनास सांगत आहे

उठ रे वेड्या आता

यश तुला बोलावत आहे....!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational