STORYMIRROR

Sushama Gangulwar

Tragedy

2  

Sushama Gangulwar

Tragedy

एकटी

एकटी

1 min
668

एकटी पडते मी जेव्हा

तुझी खूप आठवण येते

कुशीत तुझ्या डोकं घालून

खूप खूप रडावे वाटते


नजर लावून बसते मी

वाट तुझी पाहत राहते

प्रत्येक आभास तुझाच समजून

दारातून सतत डोकावून पाहते


जाता येता प्रत्येक क्षणी

वाट तुझीच पाहत राहते

दूर असूनही जवळच आहेस

असे मनाला भास होते


लढता लढता जगाशी

मी ही पूर्णतः थकून जाते

मग अचानक तुझ्या नसण्याची

मला खूपशी उणीव भासते


वाहत राहतात डोळ्यातून धारा

पाणीसुद्धा आटून जाते

आठवणीत तुझ्या एक दिवस

माझीही पापणी मिटून जाते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy