एकीचे बळ..!
एकीचे बळ..!


हातात हात उरी गगनभेदी स्वप्न
एकीचे बळ असतेच मुळी अभेद्य
चालायचे तर सर्वांनाच आहे, तर
स्पर्धेच्या वाटेवरी सोबतीने चालू
विरोध करता कुणी सोबतच भिडू
भिडायचे कशाला,
सोबतीला भिडायचे बळ कोणा
अशी एकीची सामर्थ्य गाथा
कानाकोपर्यातून वाहते
ना पराभवाची भीती त्यास
ना तिला भेदणारी कसली वाट