STORYMIRROR

Mrudula Raje

Inspirational

4  

Mrudula Raje

Inspirational

एकात्मता

एकात्मता

1 min
524

एकात्मता


सर्वधर्म समावेशक भारत माझा देश आहे।

विविधतेमध्ये एकता, भारताचा विशेष आहे॥


हिंदू , मुस्लिम, सीख, इसाई, भारताची आहेत शान।

सर्वांना सामावून घेणा-या भारताचा मला अभिमान॥


धर्म - पंथ असो कोणता, मुळी ना भेदभाव असे।

राम - रहीम एकच आम्हां, तुलसी - कबीरही भेद नसे॥


कोळ्याला सापडे समुद्री, माऊंट मेरीची मूर्ती।

स्थापन करता ऊंच ठिकाणी, मनीं एकवीरा देवीची भक्ती॥


गुरु नानक तर बंधू आमचा, गोविंद सिंघाशी जडले नाते।

गौतम बुद्धाची गाता महती,भावनेस येई भरते॥


महावीराला प्रणाम करतो, जैन धर्म हा दुजा नसे।

पारसी अग्यारीमध्ये आम्हां, लक्ष्मी - प्रतीक ते कमळ दिसे॥


सर्व धर्मांतील भले - चांगले निवडावे, ही एकच शिकवण।

सर्वांभूती मिळून राहावे, जसे पाण्यामध्ये लवण॥


अधर्मतेचे नकोच सावट, नको अडथळा धर्माचा।

प्रगतीच्या ह्या युगात आपण , करू पुकारा कर्माचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational