STORYMIRROR

Rutuja kulkarni

Fantasy Others

4  

Rutuja kulkarni

Fantasy Others

एकांतातं रहावेसे वाटते

एकांतातं रहावेसे वाटते

1 min
214

त्या दुमडलेल्या डायरीच्या कोर्‍या पानांवर,

रोजं नव्याने बंदिस्त होताना,

तिची ही कधी घुसमट होते,

एका लयीत सामावण्यासाठी,

शब्दांच्या त्या गर्देत,

कधी उगा चं फरफट होते.

रोजं नव्याने व्यक्त होण्यापेक्षा,

तिला ही कधी अबोल व्हावे वाटते.

कवितेला ही कधीतरी एकांतात रहावेसे वाटते..

लेखणीच्या बंधात राहून लिहिण्याऐवजी,

कधी मनमौजी होऊन तिला एकटेचं स्वैर व्हावे वाटते,

कवितेला ही कधीतरी एकांतात रहावेसे वाटते..

अनामिक कवीची कविता होण्याआधी,

एकदा स्वतःची एकांतात भेटं घ्यावीशी वाटते,

कवितेला ही कधीतरी एकांतात रहावेसे वाटते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy